१ जाने, २०१२

औटघटकेची ओळख

सात-एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मला बंगलोरला एक इंटरव्यू द्यायला जायचे होते. सकाळचीच फ्लाइट होती. मला आठवतं , त्याप्रमाणे ८ वाजताची असावी. त्यावेळेस  ऑनलाइन चेक-इनची पद्धत नव्हती. त्यामुळे अर्धा-एक तास आधी जाणे गरजेचे होते. आम्ही तेव्हा सी.बी.डी - नवी मुंबई ला राहत होतो. तिथून सांताक्रूझ विमानतळ किमान पाउण-एक तास अंतरावर आहे तेही ट्राफिक जास्त नसेल ह्या हिशेबाने ! बंगलोरला मुक्कामाची शक्यता असल्याने ( अर्थात मित्राच्या घरी ) मी आवश्यक ते सामान घेतले होते. लोकल-बसच्या भानगडीत न पडता सरळ कॅब ने जावे असे ठरवले. वडीलांनी पण तसंच सुचवलं. त्याप्रमाणे सकाळी ६:३० च्या सुमारास मी कोकण-भवन समोरच्या टॅक्सी-स्टॅंड वर आलो. तिथे एकच टॅक्सी उभी होती. टॅक्सी ड्रायवर गाडीतच बसला होता.
"सांताक्रूझ एअरपोर्ट चलोगे क्या ? " मी त्याला विचारले.
"जरूर चलुंगा ... ५०० रुपये लंगेंगे."  - ड्रायवर.
"५०० रुपये !! बहोत ज्यादा है .. मीटर से जितने होगे उतनाही मैं दूंगा"- मी.
वास्तविक त्या
टॅक्सीथांब्यावर उभ्या राहणाऱ्या टॅक्सीज ह्या मीटरनुसारच भाडे आकारीत. हे मला माहीत होते. तरीही हा मीटरने का येत नाहीये ? असा प्रश्न मला पडला. शिवाय तिथे दुसरी टॅक्सी नसल्यामुळे हा कदाचित वाटेल ते भाडे मागतोय असंही वाटून गेले.
"मैं ज्यादा पैसा नाही लुंगा .. भरोसा रखो साब ! .. जितना कमाना था उतना कमा लिया अब ज्यादा लेकर क्या करूंगा ? फिर भी, आपको चाहिये तो मैं मीटर डालता हूँ . आईये साब ....बैठीये !" - तो. त्याच्या आवाजात बेफिकिरी वजा अदब होती. गिऱ्हाईक गेलं तर पैसे जातील ह्याची फिकीर नव्हती पण जास्त पैसे घेतो ह्या गैरसमजापोटी असे झाले तर ते त्याला बहुतेक नको होते. त्याचे वाक्य ऐकून मात्र मी सर्द झालो. "जितना कमाना था उतना कमा लिया... " नशीब एवढ्यावरच तो बोलायचे थांबला. क्षणभर मला वाटले कि त्याच्या तोंडून " साब , वो सफेद रंग का बंगला दिखायी दे रहा है न वो मेरा है " असे काही तरी ऐकावे लागेल कि काय कोण जाणे!!

मी गाडीत बसलो. त्याने कबूल केल्याप्रमाणे मीटर टाकलं. मी बसेपर्यंत त्याने उदबत्ती लावून घेतली आणि त्याचे मंत्र पठण सुरु झाले. बहुतेक तो पंजाबी असावा कारण त्याने डोक्याला पांढरा रुमाल पगडीसारखा बांधला होता.
टॅक्सीआणि मीटर आप-आपल्या वेगाने धावत होते.सांताक्रूझ येईपर्यंत त्याचे मंत्र पठण चालूच होतं.टॅक्सी चालवण्यात कसलाही धसमुसळेपणा नव्हता. मंत्र उच्चारण चालू असताना सुद्धा गाडी चालवण्याकडे त्याचे व्यवस्थित लक्ष होते. माझं पण मीटर कडे लक्ष होतं. . का कुणास ठाऊक पण मला वाटत होतं की माझं  म्हणणं खरं ठरणार.  मीटरनुसार चलायला भाग पाडून आपण हुशारी दाखवली असं मी मनातल्या मनात म्हणत मी "जितं मया" म्हणून पाठ थोपटून घेत होतो. अशीच घासाघीस मी एखाद्या मोठ्या दुकानात महागड्या वस्तूसाठी करू शकलो असतो का ? असंही वाटून गेलं. मजल-दरमजल करत टॅक्सी शेवटी सांताक्रूझला पोहोचली. त्याने मला दरपत्रक दाखवले. तर ५२० रुपये झाले होते. त्याचे म्हणणे खरे ठरले होते. मला ओशाळल्यासारखं झालं. तरीही मी त्याला पाचशेची नोट आणि वर वीस रुपये देत म्हटले ," मैनेही कहा था, मीटर डालने के लिये तो जितना भाडा बनता है उतना ले लीजिये !!" पण वीस रुपये परत देत तो म्हणाला, "अरे नाही साब .. मैने ५०० रुपिये लेने कि बात कि थी तो मैन उतनाही लुंगा .. मुझे पता था कि ५०० रुपये से थोडा ज्यादा हि होगा .. रोज का आना-जाना है मेरा .. आपका दिल रखने के लिये मैने मीटर डाला था ..मुझे कमानाही होता तो मैं खुद हि मीटर डाल देता .. लेकीन मैंने कहा न कि जितना कमाना था उतना कमा लिया साब ..अब तो बस औरों के लिए चलानी है टॅक्सी। .... मुझे पता है सुबह जाने वालोंको दिक्कत होती हैं इसिलिए मैं अकेला आकर गाड़ी खड़ी कर देता हूँ। ....... आपने किसी और को देखा था टॅक्सी स्टॅंड पर ? … आपने आपका  सामान ले लिया ?" 
"जी हा , शुक्रिया !!" - मी
"चलता हू  साब " - असं म्हणून तो निघून गेला. त्याचे नाव वगैरे विचारायचे मला भान पण राहिले नाही.एक होता तो ज्याच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं आणि एक मी होतो जो अजून जास्त पगाराच्या नोकरीचा इंटरव्ह्युव द्यायला चाललो होतो. ठीक आहे माझे अजून करिअर बाकी आहे पण भविष्यकाळात कधी तरी माझ्या चेहऱ्यावर असे समाधान असेल का? असा विचार माझ्या मनात येऊन गेला. म्हणूनच कदाचित त्याच्या समाधानाचा मला बराच वेळ हेवा वाटत राहिला. असे आहे कि सगळेच जण ह्या स्पर्धेच्या युगात धावत असतात पण थांबायचे कुठे हे फारच कमी जणांना समजते. त्या
टॅक्सीड्रायवर ला ते समजले होते. 

अजूनही कोणी मला " अरे तुझा मोबाईलला वर्ष झाले .. बदलून टाक .. नवीन घे आता !!" असं म्हटले कि मला त्या टॅक्सी-ड्रायवर चा चेहरा दिसतो. नवीन मोबाईल घेऊन तरी मला समाधान मिळणार आहे का ? मिळालंच तर ते किती टिकेल ? उद्या परत माझा हात माझ्या पाकिटाकडे अजून भारीच मोबाईल घेण्यासाठी जाणार नाही कशावरून ? .. कारण कितीही मिळाले तरी समाधान कुठे आहे ? तेच तर हरवले आहे ...

ह्या औटघटकेच्या ओळखीमध्ये गवसलं आहे ते इतकंच कि समाधानी असलेला मी एक तरी मनुष्य पाहिलाय  - तो अनामिक
टॅक्सीड्रायवर !! 
 

-- भालचंद्र देशमुख

१८ टिप्पण्या:

Vicky म्हणाले...

Me vachla tuza blog, purn... Vikram

Neha R म्हणाले...

Mast...

kd.... म्हणाले...

kadak..!!!!

Mr. More म्हणाले...

Khup chaan

Akshay Deshmukh म्हणाले...

Good one Bhalchandra .. keep it up ..
Bara Mag Interview cha kay zala DEshmukh saheb ?

AKSHAY D.

Subodh म्हणाले...

Farach chan Bhal !!!

- Subodh

chetan bhadane म्हणाले...

Aavadale mitra keep it up...

सचिन म्हणाले...

मस्त रे, भालचंद्र! तुझी असली कौशल्ये अचानक कशी काय समोर येत आहेत? कोणाची जादू?
तुझा लेख वाचून टॉलस्टोयच्या गोष्टीची परत एकदा आठवण झाली. माणसाला किती जागा लागते? सहा - सात फूट, बस्स एवढीच! हे जितक्या लवकर आपण समजून घेऊ तितके अर्थपूर्ण जगायचा प्रयत्न करू. नाहीतर आहेच धावणे पाचवीला पुजलेले!

- सचिन

RahulN म्हणाले...

aapratim re bhalchandra..ase chote chote anubhav aaplyala vilakshan asa kahi tari shikawun jatat..

Dipti म्हणाले...

Ase changale anubhav khup kami yetat ani mhanunach lakshat suddha rahatat. Chaan vatala vachun. Khup sahaj ani sundar bhashet lihilay tumhi...

!!! Life is beautiful !!! म्हणाले...

अप्रतिम लेख, भाल !!!

Sav म्हणाले...

Tujha lekh vachnyasathi late kela tyasathi kshama asavi :)
Pan karan asa hota ki nivant vel hava hota tujha lekh vachnyasathi ... karan vel kadhun vachava asach lekh ahe ... khoop chan aani ek shikvan denara lekh :)

Bhalchandra Deshmukh म्हणाले...

धन्यवाद सचिन :)
हि कौशल्ये माझी कौलेज पासून ची आहेत .. मी कौलेज पासूनच लिहितो आहे .. माझ्या कथा पण प्रसिद्ध झाल्या आहेत.ब्लॉग नुकताच लिहू लागलो आहे .. पण तरीही हा तिसरा ब्लॉग आहे .. असो.तुम्ही म्हणता ते खरे आहे .. टॉलस्टोयची ती गोष्ट मला पण खूप आवडते.खरे तर सगळे हवसं वाटण्याचा अट्टाहास जितका लवकर आपण झुगारून देऊ तितक्या लवकर समाधानी होऊ ..परत एकदा धन्यवाद वेळ काढून ब्लॉग वाचल्याबद्दल !! ... तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रियेमुळे अजून लिहायला बळ मिळते.
- भालचंद्र

Bhalchandra Deshmukh म्हणाले...

अक्षय,
धन्यवाद .. लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल :) .. इंटरव्युव चे पुढे काहीच झाले नाही !! :)
- भालचंद्र

Bhalchandra Deshmukh म्हणाले...

राहुल,
धन्यवाद लेख वाचल्याबद्दल :) .. खरे आहे तुझे छोटे छोटे अनुभव पण खूप काही शिकवून जातात फक्त आपण त्यासाठी कायम तयार असायला हवे !!
- भालचंद्र

MEENAL VASMATKAR म्हणाले...

lihinyapeksha arth aavdla. tujha itar likhanacha tulanet he likhanachya drushtikonatun tevadhe safaidar nahi (chnagale ahe panaadhichya tulanet thode kami)pan yacha meaning ani situation superb ahe. mhanje apan pushkalada asha mansanshi bhetato pan he observe nahi karat je tu keles.

majha mate apan thambayla shikalo tar sagalech lok aayuyuat sukhi hotil. pan asehi hou shakate ki thamblo ani samplo. karan kahi janancha drushtine dhavnyatch jag ahe.....probabaly a big question mark on this question

निनावी म्हणाले...

Good one..
Parshuram

Unknown म्हणाले...

Nice....
Simple....but a thought provoking post....
Keep it up....!!

आणीबाणीचे आधुनिक 'पिनोक्यो’

राजनाथ सिंग – जे भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री आहेत - ह्यांनी ए.एन.आय. वाहिनीला दिलेली मुलाखत ऐकली. स्मिता प्रकाश ह्यांनी ती घेतली होती. त...