२६ जाने, २०११

अशा लोकशाहीची मला लाज वाटते !!

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना महाराष्ट्रात घडली. नाशिक चे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे ह्यांना पेट्रोल भेसळखोरांनी जिवंत जाळले.
सत्तेवर बसलेली माकडे सध्या इतकी माजली आहेत कि कशाचा धरबंद राहिलेला नाही. खरे तर सनदी अधिकाऱ्यांनी ह्या घटनेचा निषेध म्हणून सामुहिक राजीनामे देऊन सरकार वर दबाव आणायला हवा.
राज्य सरकार काय किंवा केंद्र सरकार काय, नपुंसक , भ्रष्ट, नाकर्ते लोक भरलेले आहेत.दोष खरे तर फक्त राज्यकर्त्यांना देण्यात अर्थ नाही. जशी जनता असते तसच सरकार तिला मिळत असते. निष्क्रिय, आत्मकेंद्री जनतेला निष्क्रियच सरकार मिळणार. इच्छा असूनही सामान्य लोक काही करू शकत नाहीत कारण राज्य घटनेनेच फक्त एकमेव हत्यार दिले आहे ते म्हणजे निवडणूक आल्यावर मत देणे.
त्यामुळे राज्य घटना ( constitution ) किती पोकळ आणि १०० च्या वर दुरुस्त्या करून किती सच्छिद्र झाली आहे हेच लक्षात येते. त्याचे खरे तर नव्याने पुनर्लेखन करायची गरज आहे. पण इच्छा कोणाची आहे ? सत्तेचा प्रमुख नुसता सज्जन माणूस असून उपयोग आहे का ? जर त्याच्यामध्ये भ्रष्ट आणि नाकर्ते लोकांवर कठोरपणे कारवाई करायची धमक नसेल तर त्याच्या चांगुलपणाचा का उपयोग ?
जे नितीश कुमार बिहार मध्ये करू शकतात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करू शकत नाहीत का ? ह्या बाबतीत मग चर्चिलच्या मला द्रष्टेपणाला दाद द्यावीशी वाटते कि त्याने भारतीयांच्या नेत्यांची मानसिकता ओळखली होती आणि जणू काही त्याचच म्हणणे आपले राज्यकर्ते खरे करून दाखवत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांना पण न जुमानणाऱ्या ह्या दळभद्री आणि निर्लज्ज राज्यकर्त्यांना आता धडा शिकवायची वेळ आली आहे आणि ह्यासाठी आपणच म्हणजे जनतेनी पुढाकार घ्यायला हवा. ते जर आपण करणार नसू तर अशा लोकशाहीचा मला अभिमान न वाटता लाज वाटते... निदान मला तरी !!

-- भालचंद्र देशमुख

२ टिप्पण्या:

Sav म्हणाले...

Khoop sundar lekh!!! awaiting for next blog :)

Sav म्हणाले...

नुकताच रिलीस झालेला "लोकपाल्ल बिल" चा ड्राफ्ट .... हे एक परिपूर्ण उदाहरण आहे आपल्या देशातील भ्रष्टाचारला खात-पाणी घालणार्या आपण निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांचे!!!

आणीबाणीचे आधुनिक 'पिनोक्यो’

राजनाथ सिंग – जे भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री आहेत - ह्यांनी ए.एन.आय. वाहिनीला दिलेली मुलाखत ऐकली. स्मिता प्रकाश ह्यांनी ती घेतली होती. त...