७ ऑग, २०११

सहजच !!! :)

प्रिय मित्र/मैत्रिणींनो,
आज फ्रेन्डशिप डे, तर विचार केला कि काय उगाच नुसत्या शुभेच्छा द्यायच्या किंवा forward केलेले SMS तसेच post  करायचे. आज थोडसे बोलतो .. तुमच्याबद्दलच !!एक छोटी गोष्ट आठवली ती सांगतो आधी !!

अब्राहम लिंकन चा एक बिली ब्राउन नावाचा गाववाला होता. मोठ गमत्या होता तो !! लिंकनची आणि त्याची लहानपणापासूनची दोस्ती होती. पुढे लिंकन अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला आणि बिली गावातच राहिला.
एक दिवस बिली ब्राऊनला वाटले की आपली मित्राचे वैभव washington ला जाऊन बघावे.त्याने स्वतःची खूप पदरमोड केली आणि पैसे जमा करून तो तिथे गेला.व्हाईट हाउस मध्ये त्याला कोण ओळखणार ? लिंकन च्या सेक्रेटरी ने त्याला विचारले की ," तुमच्या भेटीचे आधी ठरले आहे काय ?( म्हणजे appointment घेतली आहे का ?) ". त्यावर बिली म्हणाला," मी त्यांचा गाववाला मित्र आहे.त्यामुळे मला त्यांच्या भेटीचे आधीपासून ठरवण्याचे काही कारण नाही. तुम्ही त्यांना सांगा की बिली ब्राऊन आला आहे." त्याप्रमाणे सेक्रेटरी ने तसा निरोप दिला. लिंकनची मंत्रिमंडळाची महत्वाची मीटिंग चालली होती.बिली ब्राऊन चे नाव ऐकताच लिंकन मीटिंग सोडून धावत बाहेर आला आणि बिलीला घेऊन आत गेला. आपली सहकारी मंत्र्यांची आणि त्याची त्याने ओळख करून दिली आणि त्यांना म्हणाला,"हा माझा मित्र बिली. फार गमत्या आहे. ए बिली, तू लहानपणी मला जी गोष्ट सांगत होतास ती ह्यांना सांग!"

लिंकनचे मंत्री 'आ' करून बिलीकडे पाहत राहिले. बिलीने गोष्ट सांगितले. पण एकही मंत्री हसला नाही. अब्राहम लिंकन मात्र पोट धरधरून हसला. त्यादिवशी लिंकन ने बिलीला घरी ठेवून घेतले आणि स्वतःच्या टेबलवर जेवायला बसवले. जेवता जेवता त्याने बिलीला विचारले,"का आला होतास ?"
"काही नाही .. सहजच तुम्हाला पाहायला !!" बिली उत्तरला.
"काय म्हणतोस ?" , लिंकन आश्चर्याने म्हणाला," कमाल आहे तुझी ! इतक्या लांबून तू जो आलास तो फक्त भेटायला !! जो जो कोणी मला भेटायला येतो तो तो नोकरी मागायला तरी येतो नाही तर मला उपदेश करायला !! याला म्हणतात मित्र. मला गावाची एकसारखी आठवण होते. असे वाटते की हे सारे सोडून द्यावे आणि गावी जावे. पण तू भेटल्याने मला गाव भेटल्याचे समाधान झाले !!"

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला तरी आपल्या लहानपणाच्या मित्रांची वागण्याची लिंकनची ही रीत होती. गोष्ट सांगण्याचे कारण असे की "सहज" हे बिलीच्या उत्तरातला  शब्द मला महत्वाचा वाटतो. मला असे बिली सारखे मित्र आणि मैत्रिणीन लाभले आहेत.माझी मैत्रीण UK मला फोन करते - सहजच !! "तुझ्याशी खूप दिवस झाले बोलायचे  होते म्हणून सहजच फोने केला .. कसा आहेस ?". असाच एक US मधला माझ्या वाढदिवसाला आठवणीने फोन करून शुभेच्छा देतो .. सहजच !! मी त्याचा वाढदिवस नेहमी विसरतो पण त्याचा फोन कधी चुकला नाही आजपर्यंत !! अजून एक मित्र आहे तो मी ऑफिस मध्ये दिसलो नाही किंवा पूर्ण दिवस gtalk  वर online दिसलो नाही तर लगेच मला फोन करून , "भाल , कुठे आहेस .. आला नाहीस ऑफिसला ? तब्येत बरी आहे ना!!". एकजण फोन करून विचारतो,"आज lunch किंवा dinner ला येतोस का ? मस्त गप्पा मारू .. खूप दिवस झाले तुझ्याशी बोलून !!"  माझे काही चुकले तर माझ्या तोंडावर उघडपणे " तू चुकलास !! .. मला तुझे वागणे पटले नाहीये !!" असे म्हणणारे पण हेच आहेत.
अजून असे माझ्या इतर काही मित्र-मैत्रीनीनविषयी अनुभव आहेत पण हे फार मोजके माझ्या मर्मबंधातले आहेत. प्रत्येकाला  असे गणगोत लाभतच असते. पण मैत्री म्हणजे नुसते पार्ट्या , मस्ती,मूव्हीज नव्हे. तो एक प्रवासातील भाग नक्की आहे पण त्या पलीकडेही आहे ती सगळी ह्या "सहज" ह्या शब्दात आहे. मी ह्या सगळ्यांना आमच्या मैत्रीच्या प्रवासात त्यांच्यासाठी विशेष असे मैत्री जपण्यापलीकडे काय केले ते मला आठवत नाही पण तरीही त्यांचा माझ्याप्रती असलेला स्नेह काही आटला नाही. ह्या बाबतीत माझ्या नशिबाचा मलाच हेवा वाटतो. मित्र-मैत्रिणींबाबत मी केवढा श्रीमंत आहे. आपली मैत्री अशीच निरंतर चालू राहावी अशीच माझी मनापासून इच्छा आहे. आणि महत्वाचे म्हणजे मला त्यासाठी मला काही विशेष खटपट किंवा प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण .... तुम्हीच ती वीण घट्ट करून ठेवली आहे ... माझ्यासाठी !!

विशिंग यु  अ वेरी हैप्पी फ्रेन्डशिप डे !!

तुमचाच मित्र,
"भाल" , "BN " , "BND " ,"भालचंद्र" ,"BD ", "भालू"


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आणीबाणीचे आधुनिक 'पिनोक्यो’

राजनाथ सिंग – जे भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री आहेत - ह्यांनी ए.एन.आय. वाहिनीला दिलेली मुलाखत ऐकली. स्मिता प्रकाश ह्यांनी ती घेतली होती. त...