१० जून, २०१२

चहा आणि कॉफी

चहा आणि कॉफी च्या संदर्भात विचार केला तर असे लक्षात येते कि चहाचा वापर हा कॉफीच्या तुलनेत अधिक प्रमाणात होतो.कामातून 'ब्रेक' मिळावा आणि थोडी तरतरी यावी यासाठी पुष्कळ जण कॉफी ऐवजी चहाच पसंत करतात.तसं पाहिलं तर चहा हा मध्यमवर्गीयांचा अगदी जवळचा मित्र आहे. पहा तुम्ही! आपल्याकडे पाहुणे आले तर आपण त्यांना काय विचारतो "चहा घेणार का ?". काही लोकांना 'चहा' पिल्यानंतरच 'फ्रेश' वाटतं , काहींना चहा पिल्यावरच 'प्रेशर' येतं.कॉफी पेक्षा स्वस्त आणि मस्त !! शिवाय कॉलेजपासून वेळी अवेळी कटिंग प्यायची सवय लागलेली असतेच. त्यामुळे अनपेक्षितपणे एखादा जुना मित्र भेटला कि आधीच जुळलेल्या मैत्रीच्या गाठी 'चल ना, इथे टपरीवर चहा पीत-पीत गप्पा मारू'  ह्या एका वाक्याने अधिक घट्ट होतात. आधीच जवळचा असलेला मित्र 'चहा' नावाच्या अदृश्य मित्रामुळे अजूनच जवळचा वाटू लागतो. असा दुवा साधण्याचे काम चहा करत असतो. असा हा दोस्तांचा दोस्त आहे.
      

कॉफीच  मात्र तसं नाही. हि बरीचशी स्थितप्रज्ञ आहे.कदाचित चहापेक्षा जास्त महाग असल्यामुळे असेल कदाचित!! पण जरा नखरेल वाटते.चहासारखी हि दिवसातून तीन-तीन, चार-चार वेळेस घेण्याची तर गोष्ट नाही.... आणि कटिंग स्वरुपात तर घेण्याची मुळीच नाही ( कुठे मिळताना मी तरी बघितली नाही!! ) उच्चभ्रू लोकांची लाडकी आहे ही !! हिला बहिणीही पुष्कळ आहेत ... कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, एस्प्रेसो कॉफी , कॉफी विथ आईसक्रीम , कॅपाचींनो वगैरे  .. चहा हा जगत्मित्र असल्यामुळे त्याचे कोणाशीही पटकन जमते. म्हणजे पाऊस  पडत असेल तर वाफाळत्या चहाबरोबर कांदा भजी ह्यांची गट्टी जमते. शिवाय चहा-बिस्कीट, चहा-खरी, चहा-पोळी किंवा इराण्याच्या होतेल्माधला चहा-ब्रून -मस्का !! ह्या जोड्या प्रसिद्ध आहेतच.कॉफीचे ह्यांपैकी कोणाशीच जमत नाही. ही त्या शिष्ट मुलीसारखी आहे जिच्या प्रियकराने चार-चार वेळा मागणी घालूनही  त्याला झुलवतच ठेवते. म्हणूनच ही जरा जास्तच शिष्ट आहे. अलिप्तच राहणे पसंत करते. हिचा फक्त आईसक्रीमशी जमतं.पण काहीही असलं तरी ही दोन जीवांना एकत्र आणण्याचे काम करते. हे तमाम तरुणाईची सखी आहे. ही प्रेयसीच्या त्या मैत्रिणीसारखी आहे जी आपली मैत्रिणीची 'जोडी' जमावी म्हणून प्रयत्नशील असते. जेंव्हा एक मुलगा आणि मुलगी एक-मेकांना प्रथम भेटतात तेंव्हा सहवास आणि जोडीने प्रीती वाढावी म्हणून 'चहा' पेक्षा त्यांना 'कॉफी' ही मैत्रीणच जवळची वाटते. ही गरज ओळखून काही भल्या लोकांनी 'बरिस्ता', 'सी सी डी' , 'अरोमा' यांसारखी फक्त कॉफीसाठी वाहिलेली दुकाने उघडली आहेत. खरे तर त्यांना 'बागा'च  म्हणायला हवं.... कायम फुललेल्या असतात !! पण ह्या भल्या महाग आहेत अशी माझी एक तक्रार आहे. म्हणूनच का कोण जाने मला 'बरिस्ता'च्या पायरीवर पाय ठेवायची पण हिम्मत होत नाही... पण खरे सांगू का ?  ह्या बागांमध्ये ज्यासाठी आणि ज्यांना घेऊन जायचे असते अश्या घटनाच घडल्या नाहीत आयुष्यात !! .. असो.. तूर्तास चहा-कॉफी च्या इतक्या विवेचानंतर इथेच थांबतो ...
( माझ्या 'कॉफी' कथेतून )
 
- भालचंद्र देशमुख

१० टिप्पण्या:

Prashant म्हणाले...

Chan ahe

Mr. More म्हणाले...

Kadhi bhetos cha la ? :)

Unknown म्हणाले...

Chaan aahe "Chaha aani Cofee"!
Mala watate tu Barista chya payari war pay thewala pahije, cause u never know.... tuza coffee friend tuzi waat baghat asel!!!

Ketan म्हणाले...

coffee = shisht mulagi.. hahaha jamaley upma.. tas chaha ani "upma" combo sudha mastach ahe, nai ka :)
pan ekda ka tya shisht mulichi savay lagli ki tichya vachun karamat nai ;)

trekker_nilesh म्हणाले...

Zakas re Bhalchandra

anuja म्हणाले...

surekh!!! me ek original coffee fan aslyamule patlay mala bhalchandra!!!

chetan bhadane म्हणाले...

Coffee With Karan Chya Evaji Chai with Bala Ha show Pan Chalel

Vips म्हणाले...

चहा आणि कॉफी...!!! मस्तच...!!!
आजून एक गोष्ट...चहाला आपण कायम "चहा" असे मराठीतच बोलतो, पण त्या शिष्ट मुलीला (Coffeeला) मात्र कायम English मधेच बोलवावे लागते :)

Mayura म्हणाले...

Chaha Mhanje Chahach! Comparison surekh Keli ahe

Ruj Paithankar म्हणाले...

Wahhh ! Loved the metaphors ! :) Light and refreshing !

आणीबाणीचे आधुनिक 'पिनोक्यो’

राजनाथ सिंग – जे भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री आहेत - ह्यांनी ए.एन.आय. वाहिनीला दिलेली मुलाखत ऐकली. स्मिता प्रकाश ह्यांनी ती घेतली होती. त...